चिंचवड ( वार्ताहर) चिंचवड येथील विकास शिक्षण मंडळ संचालित श्री. शिवछत्रपती शिवाजी राजे माध्यमिक विद्यालयाचा सन 2024-25 चा इयत्ता दहावीचा बोर्ड परीक्षेचा निकाल 100% लागला असून, एकूण 272 विद्यार्थ्यांपैकी तब्बल 61 विद्यार्थ्यांनी 90% पेक्षा अधिक गुण मिळवून शाळेचे नाव उज्ज्वल केले आहे.
प्रथम तीन क्रमांकात झळकलेले विद्यार्थी:
1. कु. साळुंखे हर्षाली — 98.80% (प्रथम क्रमांक)
2. चि. प्रतिक सातपुते व कु. स्वराली उंबरकर — 97.40% (द्वितीय क्रमांक)
3. चि. वेदांत वाघमोडे व कु. अनुष्का थोरात — 97% (तृतीय क्रमांक)
या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष जगदीश (दादा) जाधव, सचिव संजय (भाऊ) जाधव, तसेच संचालक विजय जाधव यांनी सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे मनःपूर्वक अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
या यशस्वी निकालानंतर प्राचार्य बाळाराम पाटील, साहेबराव देवरे, पर्यवेक्षक दत्तात्रय भालेराव, उपमुख्याध्यापक सुषमा संधान, मनीषा जाधव, छाया ओव्हाळ, ज्यू कॉलेज विभाग प्रमुख अविनाश सावंत, तसेच वर्गशिक्षक रमेश ढवळे, अजिनाथ गुराळकर, वासंती पाटील, सुचित्रा झेंडे व फौजीया मोमीन यांनी सर्व विद्यार्थ्यांचे मनापासून अभिनंदन केले.
विद्यालयाच्या एकंदर गुणवत्तापूर्ण शिक्षणपद्धतीचे हे फळ असून, या यशात शिक्षक, पालक आणि विद्यार्थ्यांचा समन्वय महत्त्वाचा ठरला असल्याचे विद्यालयाने नमूद केले आहे.




