वैष्णवी हगवणे हिच्या मृत्यूनंतर तिच्या बाळाच्या ताब्यावरुन वाद निर्माण झाला होता. बाळाला वैष्णवीच्या बाळाला माहरेच्यांपासून लपवण्यात आलं होते. दरम्यान, या प्रकरणात महिला आयोगाने गंभीर दखल घेतल्यानंतर काल (दि.22) रोजी बाणेर हायवेवर अज्ञात व्यक्तीने तिच्या बाळाला वैष्णवीच्या घरच्यांकडेच म्हणजेच कस्पटे कुटुंबाला सोपवण्यात आले. अशातच तिच्या बाळासंदर्भात धक्कादायक माहिती समोर आली आहे. वैष्णवीच्या बाळावर अंगावर इंजेक्शनचे व्रण असल्याची माहिती कस्पटे कुटुंबाने दिली आहे.
बावधन पोलिसांनी राजेंद्र हगवणे आणि सुशील हगवणेला अटक केल्यानंतर स्टेशन डायरी नोंद केली आहे. राजेंद्र हगवणे व सुशील हगवणेला शिवाजीनगर कोर्टात दुपारी दोन वाजता हजर करण्यात येणार आहे. बावधन पोलिसांकडून आरोपींना किती दिवसांचा रिमांड मागला जाणार, हे दुपारनंतरच कळेल. फरार असताना राजेंद्र व सुशीलला कोणी मदत केली, हे पाहाणं महत्त्वाचं आहे. ते कुठल्या ठिकाणी लपून बसले होते त्याचा शोध घ्यायचा आहे, अशा करणांवर पोलिस रिमांड मागू शकतात.