देहूरोड : गांधीनगर परिसरात दहशत निर्माण करणाऱ्या चंदू गोरख सकट आणि त्याचा साथीदार करण अरुण सकट या दोघांना अखेर पोलिसांनी चोख प्रत्युत्तर दिलं. गुन्हेगारी वर्चस्व गाजवू पाहणाऱ्या या व्यक्तींची देहूरोड पोलिसांनी शहरात धिंड काढत पोलिसी अद्दल घडवली.
पीडित अनिल काळखैर यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, चंदू, करण आणि त्यांच्या इतर साथीदारांनी त्यांना बेदम मारहाण केली होती. या घटनेवरून देहूरोड पोलीस ठाण्यात विविध कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या पार्श्वभूमीवर पोलिसांनी चंदूला अटक करून त्याच्या हातात बेड्या घालून परिसरात “साहेब… मी भाई नाही..! म्हणत धिंडफेरी काढली. परिसरात त्याच्या दहशतीला पूर्णविराम देण्याचा पोलिसांचा हा प्रयत्न नागरिकांमध्ये चर्चेचा विषय ठरला आहे.




