वडगाव मावळ : मावळ तालुक्यातील टाकवे बुद्रुक येथील इंद्रायणी नदीवरील जुना पूल पावसाळ्यात दररोज पाण्याखाली जात असल्याने नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी धोका निर्माण होत होता. यावर्षीही पूलाला पाणी जवळपास पोहोचल्याने प्रशासनाने तातडीने कारवाई केली.
नवीन पूल बांधकामाचे काम पूर्ण झाल्यानंतर, उप अभियंता श्री. धनराज दराडे यांच्या मार्गदर्शनाखाली आज, १६ जून २०२५ रोजी, हा पूल वाहतुकीसाठी खुला करण्यात आला आहे. या निर्णयामुळे स्थानिक नागरिकांना मोठा दिलासा मिळाला असून, पावसाळ्यातील संभाव्य धोका टळला आहे.

प्रशासनाने इतर धोकादायक पुलांचे ऑडिट सुरू केले असून, भविष्यात अशा प्रकारच्या दुर्घटनांपासून बचाव करण्यासाठी आवश्यक ती पावले उचलण्याचे आश्वासन दिले आहे. नागरिकांनी प्रशासनाच्या सूचनांचे पालन करून सुरक्षिततेचा विचार करूनच प्रवास करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.




