मुंबई – माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत राज्याचे उपमुख्यमंत्री मा. अजितदादा पवार यांच्या नेतृत्वातील निळकंठेश्वर पॅनलने दणदणीत विजय मिळवला आहे. या ऐतिहासिक यशानंतर आज मुंबई येथे मा. अजितदादा पवार यांची सदिच्छा भेट घेऊन त्यांचे अभिनंदन करण्यात आले.
या विशेष भेटीप्रसंगी यश दत्ताकाका साने आणि नगरसेवक पंकजभाऊ भालेकर हे उपस्थित होते. त्यांनी उपमुख्यमंत्री अजितदादांचे मार्गदर्शन व नेतृत्व यामुळेच हे यश मिळाले असल्याची भावना व्यक्त केली.
या भेटीत कारखान्याच्या भविष्यातील विकास योजनांवरही सकारात्मक चर्चा झाल्याची माहिती सूत्रांनी दिली. निळकंठेश्वर पॅनलचा हा विजय म्हणजे ग्रामविकास, सहकार आणि अजितदादांच्या विकासदृष्टीचा मोठा विजय मानला जात आहे.