
पिंपरी : शहरातील थेरगाव परिसरातील हजारो नागरिकांनी आज पिंपरी चिंचवड महापालिकेवर धडक मोर्चा काढला आहे. दाट लोक वस्ती असलेल्या थेरगाव परिसरामध्ये महापालिकेने टाकलेल्या चुकीचे आरक्षण व विकास आराखड्यातील रस्त्यांचा विरोधात हजारो नागरिक हातात फलक घेऊन रस्त्यावर उतरले आहेत.
नवीन प्रारूप विकास आराखड्यातील अंतर्गत रिंगरोडसह सर्व कालबाह्य आरक्षणे रद्द करावीत, रहिवाशांच्या जमिनी फ्री होल्ड करून त्यांना घरांचे प्रॉपर्टी कार्ड द्यावे, यासाठी थेरगावच्या नागरिकांनी सोमवारी (दि.३०) स्वाभिमानी कर्मचारी संघर्ष चळवळीच्या माध्यमातून जनआक्रोश मोर्चाद्वारे महापालिकेवर धडक मारली. थेरगाव-काळेवाडीत कडकडीत बंद पाळण्यात आला. नागरिक, व्यापारी, स्थानिक संस्था आणि सर्वपक्षीय पदाधिकाऱ्यांनी बंदला उत्स्फूर्त पाठिंबा दिला.