पिंपरी – : १ करोड ११ लाखांची फसवणूक करणाऱ्या  टोळीला सायबर पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. १० ते १५ टक्क्यांचा परतावा मिळवून देण्याचा बहाण्याने ही फसवणूक करण्यात आली. शरद दिलीप सराफ, सूरज तात्याराम सायकर, संकेत संदीप व्हावले, नागेश नरसिंगराव गंगे आणि योगीराज किसन जाधव अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांना एक्सप्रेस प्लॅटफॉर्म कंपनीच्या व्हाट्स नंबर वरून फिर्यादी यांच्याशी संपर्क साधण्यात आला. गुंतवणूक केल्यास १० ते १५ टक्के परतवा मिळेल अस अमिश दाखवण्यात आले. फिर्यादी यांनी विश्वास ठेवून आधी काही पैसे गुंतवले, त्यात त्यांना चांगला परतवा मिळाला. आरोपींनी फिर्यादी यांचा विश्वास संपादन केला. फिर्यादीने पैशांच्या अमिषापोटी आरोपींच्या वेगवेगळ्या बँक खात्यात तब्बल १ करोड ११ लाख रुपये गुंतवले. त्यानंतर मात्र परताव्याची रक्कम बँक खात्यात जमा होत नसल्याच निदर्शनास आले.

फिर्यादीने आरोपीला फोनद्वारे माहिती दिली. यावर रक्कम काढायची असल्यास तुम्हाला शासनाचा टॅक्स भरावा लागेल. तुम्हाला रक्कम काढता येणार नाही. असं सांगण्यात आलं. फिर्यादी यांना आपली फसवणूक झाल्याचं समजलं. या प्रकरणी अखेर पिंपरी-चिंचवड च्या सायबर पोलीस ठाण्यात जाऊन गुन्हा दाखल केला. रक्कम मोठी असल्याने सायबर पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवली. तांत्रिकदृष्ट्या तपास केला. सायबर पोलीस निरीक्षक रविकिरण नाळे यांनी सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रवीण स्वामी यांच्या टीम ला तपास करण्यास आदेश दिले.