पिंपरी : सातारा, कोल्हापूर, सांगली, सोलापूर आणि पुणे जिल्ह्यांतील विविध मंडळे आणि पश्चिम महाराष्ट्र युवा मंच यांच्या संयुक्त विद्यमाने “सत्कार सोहळा, स्नेह मेळावा आणि स्नेहभोजन” हा कार्यक्रम रविवार, दिनांक ३ ऑगस्ट २०२५ रोजी सायंकाळी ५.३० वाजता आयोजित करण्यात आला आहे. हा कार्यक्रम स्व. यशवंतराव चव्हाण स्मृती भवन, सेक्टर २७अ, सिटी प्राईड शाळेसमोर, संत तुकाराम उद्यानामागे, प्राधिकरण, निगडी, पुणे-४४ येथे पार पडणार आहे.
या विशेष कार्यक्रमात १०वी व १२ वी उत्तीर्ण गुणवंत विद्यार्थी तसेच विविध क्षेत्रात विशेष प्राविण्य मिळवलेल्या व्यक्तींना सन्मानित करण्यात येणार आहे. शैक्षणिक, सामाजिक आणि सांस्कृतिक क्षेत्रातील योगदानाची दखल घेऊन प्रेरणादायी युवा, कार्यकर्ते यांचा सत्कार सोहळा मोठ्या उत्साहात पार पडणार आहे.
कार्यक्रमाचे प्रमुख आकर्षण:
मुख्य पाहुणे: मा. ना. श्रीमंत छत्रपती श्री शिवेंद्रसिंहराजे भोसले
(सार्वजनिक बांधकाम मंत्री, महाराष्ट्र राज्य)
अध्यक्षस्थानी: मा. ना. अण्णा बनसोडे
(उपाध्यक्ष, महाराष्ट्र विधानसभा)
प्रमुख मान्यवरांची उपस्थिती:
आमदार शशिकांत शिंदे
आमदार महेशदादा लांडगे
आमदार शंकरशेठ जगताप
मा. आमदार सौ. अश्विनीताई जगताप
आमदार समाधान अवताडे
आमदार सौ. उमाताई खापरे
आमदार अमित गोरखे
माजी आमदार अनुप मोरे
कार्यक्रमात सहभाग घेणाऱ्या विद्यार्थ्यांनी आपली गुणपत्रिका, माहितीपत्रक किंवा विशेष कार्य अहवाल २० जुलैपर्यंत आयोजकांकडे जमा करण्याची विनंती करण्यात आली आहे.
संपर्क: श्री. निशांत जाधव – 7083450203
श्री. अशोक चव्हाण – 9767002530
आयोजक मंडळ
- यशवंतराव चव्हाण स्मारक समिती
- सातारा जिल्हा मित्र मंडळ
- सांगली जिल्हा मित्र मंडळ
- सोलापूर जिल्हा मित्र मंडळ
- पश्चिम महाराष्ट्र युवा मंच
- सातारा-कोल्हापूर-सांगली-सोलापूर महिला मंडळ
- साकोसां ज्येष्ठ नागरिक संघ
सदर सोहळा हा सामाजिक सलोखा, ज्ञानाचा गौरव आणि पश्चिम महाराष्ट्रातील एकात्मतेचे प्रतिक ठरणार आहे. तरी सर्व नागरिकांनी सहकुटुंब उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी, असे आयोजकांतर्फे आवाहन करण्यात आले आहे.