चिखली (पिंपरी चिंचवड) – लायन्स क्लब ऑफ पिंपरी चिंचवड स्टार आणि डिस्टिक वुमन एम्पॉवरमेंट यांच्या संयुक्त विद्यमाने चिखली पोलीस स्टेशन येथे मोफत आरोग्य, दंत व स्किन तपासणी शिबिर यशस्वीपणे पार पडले. या शिबिराचे आयोजन लायन प्रीती बोंडे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले.
या उपक्रमात माधवबाग पिंपरी, देवकाते डेंटल केअर, गुंजकर हॉस्पिटल आणि एव्हिस स्किन क्लिनिक यांचे मोलाचे सहकार्य लाभले. शिबिरात सुमारे ५० पोलीस अधिकाऱ्यांची तपासणी करण्यात आली.
सेवा देणाऱ्या डॉक्टरांमध्ये लायन डॉ. शितल मोरे, लायन डॉ. प्रज्ञा देवकाते, लायन डॉ. स्वाती देवरे व लायन डॉ. भाग्यश्री गुंजकर यांचा समावेश होता. या डॉक्टरांनी सकाळपासून वेळेवर उपस्थित राहून समाजासाठी समर्पित सेवा दिली.
शिबिराला वरिष्ठ पोलीस निरीक्षक मा. विठ्ठल साळुंखे, पोलीस निरीक्षक श्री. अमोल फडतरे, सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री. राम गोमारे, श्री. सिद्धनाथ बाबर, महिला पोलीस उपनिरीक्षक स्नेहा खरात, महिला पोलीस हवालदार दिपमाला लोहकरे यांच्यासह कर्मचारी उपस्थित होते.
लायन्स क्लबच्या पदाधिकाऱ्यांमध्ये लायन विद्या वकारे, लायन डॉ. शितल मोरे, लायन डॉ. प्रज्ञा देवकाते, लायन नितेश बोंडे, लायन डॉ. प्रेरणा गोपाळे, लायन जयंत बोंडे, लायन सुनील भोयर, लायन जितेश वकारे, लायन अमोल तुरखडे यांनी सक्रिय सहभाग नोंदवला. या उपक्रमासाठी सहकार्य केल्याबद्दल पोलीस प्रशासनाचे व सहभागी डॉक्टरांचे विशेष आभार लायन प्रीती बोंडे यांनी मानले.