रहाटणी, पिंपरी चिंचवड | १६ जुलै २०२५
महाराष्ट्राचे लाडके उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष मा. श्री. अजितदादा पवार यांच्या वाढदिवसानिमित्त एक सामाजिक भान जपणारा उपक्रम राबवण्यात येत आहे. मा. विरोधी पक्षनेते श्री. विठ्ठल उर्फ नाना काटे यांच्या प्रेरणेतून व मार्गदर्शनाखाली, युवानेते सागर कोकणे व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी प्रभाग क्रमांक २७, रहाटणी-काळेवाडी यांच्या वतीने भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
📌 शिबिराची ठळक माहिती:
🗓 रविवार, दिनांक २० जुलै २०२५
🕙 सकाळी १० ते दुपारी ३ वाजेपर्यंत
📍 सागर कोकणे जनसंपर्क कार्यालय, गोडांबे चौक, रहाटणी
या सामाजिक उपक्रमामध्ये प्रत्येक रक्तदात्यास एक आकर्षक भेटवस्तू — हेल्मेट किंवा हेडफोन देण्यात येणार आहे, ही विशेष बाब लक्षवेधी ठरत आहे.
नागरिक, तरुणवर्ग व रक्तदात्यांना आवाहन
या उपक्रमामार्फत आपण एखाद्याचे प्राण वाचवू शकतो. म्हणूनच सर्व रहिवाश्यांनी, तरुणांनी व सेवाभावी व्यक्तींनी यामध्ये सहभाग घेऊन रक्तदानाच्या माध्यमातून आपली सामाजिक जबाबदारी पार पाडावी, असे आवाहन आयोजकांकडून करण्यात येत आहे.
ही केवळ रक्तदान मोहीम नसून…
हे रक्तदान शिबिर सामाजिक एकोपा, सार्वजनिक आरोग्य आणि कार्यकर्त्यांची बांधिलकी यांचे उत्तम उदाहरण ठरणार आहे. अजित दादांचा कार्यप्रेरणा संदेश पोचवणारा हा उपक्रम निश्चितच प्रेरणादायी ठरेल.
आयोजक: राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, प्रभाग क्रमांक २७, रहाटणी – काळेवाडी, पिंपरी चिंचवड शहर




