पिंपरी : शहराच्या नागरी विकासात महत्त्वपूर्ण ठरणाऱ्या पुणे मुंबई रस्त्यावरील पिंपरी गावाशी जोडणारा रेल्वे उड्डाणपूल प्रकल्पाचे काम सध्या झपाट्याने सुरू असून, त्याचा प्रगती आढावा नुकताच नगरसेवक संदीपभाऊ वाघेरे आणि स्थापत्य प्रकल्प विभागाचे कार्यकारी अभियंता विजय भोजने यांनी घेतला.

या दौऱ्यात कामाच्या गुणवत्तेची तसेच प्रगतीची सविस्तर पाहणी केली. काम अधिक गतिमान व्हावे आणि ठरलेल्या कालमर्यादेत पूर्ण व्हावे, यासाठी संबंधित ठेकेदार आणि अभियंत्यांना स्पष्ट सूचना देण्यात आल्या. कामाच्या दर्जावर कोणतीही तडजोड होणार नाही, असेही ठामपणे वाघेरे यांनी सांगितले.
या प्रकल्पाची अंतिम मुदत नोव्हेंबर 2025 अशी ठरवण्यात आली आहे. मात्र, निर्धारित वेळेच्या आधीच काम पूर्ण करून नागरिकांना दिलासा मिळवून देण्याचा विश्वास संदीपभाऊ वाघेरे यांनी व्यक्त केला. यावेळी सामाजिक कार्यकर्ते दिनेश मूलचंदानी उपस्थित होते. नगरसेवक संदीपभाऊ वाघेरे यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प प्रत्यक्षात आकार घेत आहे.

हा रेल्वे उड्डाणपूल पूर्णत्वास गेल्यानंतर पिंपरी गाव सह पिंपळे सौदागर रहाटणी परिसरातील रहदारीचा मोठा प्रश्न सुटणार आहे. रेल्वे पूल ओलांडता उड्डाणपूल झाल्यामुळे नागरिकांना सुरक्षित आणि सुलभ मार्ग मिळणार आहे. पिंपरी गावचा कायापालट करणारे नगरसेवक संदिप वाघेरे यांची सातत्य, संकल्प आणि जनतेच्या हितासाठी असलेली बांधिलकी यामुळेच हा प्रकल्प आज प्रत्यक्षात साकारताना दिसत आहे.




