रावेत : वार्ताहर ७ जानेवारी २०२६
पिंपरी चिंचवड महानगरपालिका निवडणुकीत प्रभाग क्रमांक 16 किवळे, मामुर्डी, रावेत, गुरुद्वारा या परिसरामध्ये राजकीय घडामोडींना वेग आला असून, येथील निवडणूक चुरशीची होण्याची चिन्हे स्पष्ट दिसू लागली आहेत. मागील निवडणुकीत विजयी ठरलेल्या भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नगरसेवकांच्या विरोधात एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे पॅनल सशक्त पर्याय म्हणून पुढे आले असून प्रचारात त्यांनी धुरा खासदार श्रीरंग बारणे यांनी स्वतःकडे घेतली आहे.
किवळे–मामुर्डी परिसरात युवा नेते बापू कातळे यांचे महिला व युवक यांचे संघटन कौशल्य आणि जनतेसोबत सक्रिय सहभागामुळे शिवसेनेच्या पॅनलला मोठे जनाधार मिळत असल्याचे चित्र दिसत आहे. प्रभाग क्रमांक 16 मधील आदर्श नगर आणि किवळे परिसरात शिवसेनेचा “खिच के तान धनुष्यबाण” घोषणांनी परिसर ढवळून निघाला आहे. घरोघरी जाऊन नागरिकांशी थेट संवाद, जनसंपर्क आणि विकास मुद्द्यांवर चर्चा करत प्रचार अधिक जोरदार करण्यात येत आहे.
शिवसेनेच्या सौ. रेश्मा बापूजी कातळे यांना अधिकृत उमेदवारी जाहीर झाल्यानंतर रावेत, किवळे व मामुर्डी परिसरातील नागरिकांमध्येही नव्या नेतृत्वाबद्दल आशा निर्माण झाल्याचे चित्र समोर येत आहे. वर्षानुवर्षे प्रलंबित असलेल्या स्थानिक प्रश्नांची सोडवणूक, स्वच्छता, पाणीपुरवठा, रस्ते-विकास, आरोग्य, महिला सक्षमीकरण आणि युवकांसाठी संधी निर्माण करण्याचे आश्वासन देत शिवसेनेच्या उमेदवारांनी आपली भूमिका ठामपणे मांडली आहे. त्यांना जनता “आपलीच उमेदवार” म्हणून नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.
या प्रभागात भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना अशी तिरंगी लढत होत आहे. 14 वर्षापासून ठराविक लोकप्रतिनिधी महापालिकेत प्रतिनिधित्व करत असतानाही प्रभागात समस्यांचा वनवास संपला नाही. त्यामुळे नव्या विचारांचे लोकप्रतिनिधी महापालिकेतील निवडून देण्यासाठी जनतेतून उस्फुर्त प्रतिसाद आहे. शिवसेनेचे पॅनल निर्णायक आघाडी घेत असल्याचे राजकीय समीकरणे सूचित करत आहेत. आगामी काही दिवसांत प्रचार आणखी आक्रमक होण्याची शक्यता असून, प्रभाग 16 चा निकाल शहराच्या राजकारणात महत्त्वपूर्ण ठरणार आहे, यात शंका नाही.




