प्रभाग क्र. २५ (वाकड–ताथवडे–पुनावळे)
पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीचा प्रचार आता शिगेला पोहोचला असून प्रभाग क्रमांक २५ वाकड, ताथवडे आणि पुनावळे परिसरात राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. या प्रभागातून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे अधिकृत उमेदवार चेतन पवार यांनी प्रचारात आघाडी घेतली असल्याचे चित्र सध्या दिसून येत आहे.
चेतन पवार हे दररोज घरोघरी जाऊन नागरिकांशी थेट संवाद साधत असून, परिसरातील प्रश्न, समस्या आणि अपेक्षा जाणून घेत आहेत. “कामाचा माणूस” अशी ओळख असलेल्या चेतन पवार यांच्याकडे प्रभागातील महिलावर्ग आणि ज्येष्ठ नागरिक मोठ्या आशेने पाहत आहेत. त्यांच्या प्रचारादरम्यान अनेक लाडक्या बहिणी औक्षण करून शुभेच्छा देताना दिसत असून, त्यातून जनतेचा आपुलकीचा प्रतिसाद स्पष्ट होत आहे.
विशेष म्हणजे, चेतन पवार हे या प्रभागातील एकमेव पुरुष उमेदवार असल्यामुळे परिसरातील नागरिकांकडून त्यांना मोठा पाठिंबा मिळत आहे. विकासकामांचा अनुभव, सातत्याने लोकांमध्ये राहण्याची सवय आणि विनम्र स्वभाव यामुळे नागरिकांमध्ये त्यांच्या नावाची चर्चा जोर धरू लागली आहे.
वाकड, ताथवडे आणि पुनावळे परिसरातील पायाभूत सुविधा, वाहतूक, पाणीपुरवठा, आरोग्य व महिला सुरक्षेच्या प्रश्नांवर ठोस भूमिका मांडत चेतन पवार यांनी प्रचाराला वेग दिला असून, येत्या निवडणुकीत प्रभाग क्रमांक २५ मधील लढत अधिक रंगतदार होण्याची चिन्हे दिसत आहेत.




