आयपीएल मधील क्रिकेट मॅचवर सट्टा घेणा-या चौघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपींकडून 27 लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे. काळेवाडी येथे शनिवारी (दि.02) सायंकाळी ही कारवाई करण्यात आली.
भूपेंद्र चरणजीतसिंग गिल (वय 38, रा. काळेवाडी), रिक्की राजेश खेमचंदानी (वय 36, रा. पिंपरी) सुभाष रामकिसन अगरवाल (वय 57, रा. पिंपरी), सनी सुखेजा (रा. पिंपरी) अशी गुन्हा दाखल चौघांची नावे आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आयपीएल स्पर्धेतील गुजरात टायटन्स आणि दिल्ली कॅपिटल्स या संघाच्या सामान्यावर आरोपी सट्टा घेत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. पोलिसांनी काळेवाडी येथे छापा टाकून आठ मोबाईल, जुगाराचे साहित्य आणि रोख रक्कम असा 27 लाख 25 हजार 450 रूपयांचा मुद्देमाल जप्त केला. वाकड पोलीस अधिक तपास करीत आहेत.