चिखली : दरोड्याची तयारी केल्याप्रकरणी चिखली पोलिसांनी पाच जणांना अटक केली आहे. विशेष म्हणजे वयाच्या विशीत आणि अल्पवयीन असलेली मुले यामध्ये सहभागी आहेत. अल्पवयीन मुलांना चौकशीसाठी हजर राहण्याच्या सुचनेवर पालकांच्या ताब्यात दिले आहे. चिखली येथे शुक्रवारी (दि.01) सायंकाळी 5.30 वा ही प्रकार उघडकीस आला.
शस्त्र विरोधी पथकाचे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक लखनकुमार कोंडीबा वाव्हळे यांनी याबाबत चिखली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
रितेश शंकर टेकाम (वय 19, रा. पाटीलनगर, चिखली), आकाश रवि जैस्वाल (वय 19, रा. चिखली), ऋषीकेश राजेंद्र भोसले (वय 21, रा. चिखली), टिळकराम बाबुलाल गौड (वय 19, रा. चिखली) आणि वैष्णव दिपक चेके (वय 19, रा. चिखली) असे अटक आरोपींची नावे आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी दरोडा टाकण्याच्या तयारीत असताना, त्यांच्याजवळ स्टिलची तलवार, लोखंडी कोयता, सुरा, स्टिक, मिरची पावडर असे साहित्य मिळून आले. यातील काही आरोपी अल्पवयीन असून, त्यांना पालकांच्या ताब्यात देण्यात आले आहे. तर, पाच जणांना अटक केली आहे. तीन आरोपी घटनास्थळावरून फरार झाले. चिखली पोलीस अधिक तपास करीत आहेत.