शहरात स्पा सेंटरमध्ये वेश्याव्यवसाय चालविला जात असल्याचे अनेक प्रकार समोर आले आहेत. शुक्रवारी दि.01 एप्रिल सामाजिक सुरक्षा पथकाने जगताप डेअरी, पिंपळे सौदागर येथील स्पा सेंटरवरती कारवाई केली. यामध्ये चार मुलींची सुटका करून स्पा मॅनेजरला अटक करण्यात आली. पोलिसांनी घटना स्थळावरून 20,220 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
आलीन उद्दीन अब्दुल समद (वय 25, रा. विमाननगर, मुळगाव आसाम) असे अटक स्पा मॅनेजरचे नाव आहे. तर, महिला स्पा मालकाचा पोलीस शोध घेत आहेत. दोघांविरोधात सांगवी पोलीस ठाण्यात भारतीय दंड विधान कलम 370, (3), 34 सह अनैतिक व्यापारास प्रतिबंध अधिनियम 1956 चे कलम 3, 4, 5 प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी जगताप डेअरी, पिंपळे सौदागर येथील कॅसल आणि वेलनेस सेंटर येथे वेश्याव्यवसाय चालवित असल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली. पोलिसांना माहिती पडताळून या ठिकाणी छापा टाकला व पश्चिम बंगाल येथील दोन व महाराष्ट्रातील दोन अशा चार महिलांची वेश्याव्यवसायातून सुटका करण्यात आली. सामाजिक सुरक्षा पथकाने ही कारवाई केली. स्पा मॅनेजरला अटक केली असून, स्पा मालकाचा पोलीस शोध घेत आहेत. घटनास्थळावरून 20,220 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.