गुढीपाडवा व मराठी नववर्ष निमित्त नगराध्यक्ष मयुर ढोरे यांच्या संकल्पनेतून वडगांव नगरीत प्रथमच भव्य दिव्य शोभायात्रेचे आयोजन करण्यात आले होते.
या शोभायात्रा कार्यक्रमात ढोल पथक, पाडवा चित्ररथ, रांगोळी पायघड्या, लाठीकाठी – आगीचे प्रात्यक्षिके, माझी वसुधंरा चित्ररथ, वारकरी पथक – दिंडी परंपरा, छत्रपती शिवाजी महाराज संच तसेच पारंपरिक लोककला संच ( मंगळागौर, वासुदेव, पोतराज, वाघ्या मुरुळी, नगारा, गोंधळी, कोळी नृत्य, लावणी नृत्य ) शाळेतील विद्यार्थी शिक्षक इत्यादींचा समावेश होता.
या कार्यक्रमास मावळ तालुका काँग्रेस आयचे माजी अध्यक्ष बाळासाहेब ढोरे, मा. सभापती गणेशआप्पा ढोरे , संत तुकाराम सहकारी साखर कारखान्याचे संचालक सुभाषराव जाधव, नगराध्यक्ष मयूर ढोरे, उपनगराध्यक्षा पुनम जाधव, मा उपसरपंच तुकाराम ढोरे, चंद्रकांत ढोरे, शांताराम कुडे, गंगाराम ढोरे, नगरसेवक राजेंद्र कुडे, राहुल ढोरे,चंद्रजीत वाघमारे, शारदा ढोरे, माया चव्हाण, प्रमिला बाफना, पंढरीनाथ ढोरे, प्रविण ढोरे, गणेश जाधव, सिद्धेश ढोरे, यशवंत शिंदे, महेंद्र ढोरे, ओंकार ढोरे, अतुल राऊत, विशाल वाहिले, आफताब सय्यद, महिला प्रतिष्ठानच्या अध्यक्षा अबोली ढोरे, उपाध्यक्षा चेतना ढोरे, आणि मोरया महिला प्रतिष्ठानच्या सर्व संचालिका, महिला सदस्या, मोरया मित्र मंडळ व मोरया ढोल पथकाचे सर्व क्रियाशील सदस्य तसेच शहरातील जेष्ठ नागरिक, पदाधिकारी, युवक कार्यकर्ते, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी श्री पोटोबा महाराज प्रासादिक दिंडीचे सांप्रदायिक क्षेत्रातील सर्व सभासद महिला भगिनी उपस्थित होते. शोभायात्रा मिरवणूकीची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराज चौक येथून होऊन पंचायत समिती चौक येथे समारोप झाला.
यावेळी शहरातील नागरिक, लहान मुले, महिला भगिनी मोठ्या संख्येने पारंपारिक वेशभूषेत शोभायात्रेत सहभागी झाले होते. मिरवणूकीदरम्यान संपूर्ण शहरात उत्साहाचे व आनंदाचे भक्तिमय वातावरण निर्माण झाले होते. गुढीपाडवा शोभायात्रेत मोरया महिला प्रतिष्ठानच्या महिला सदस्यांची उपस्थिती लक्षणीय होती.