पिंपरी : राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष मेहबुबभाई शेख, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष अजित गव्हाणे, मुख्य समन्वयक योगेश बहल, प्रदेश कार्याध्यक्ष रविकांत वरपे यांच्या मार्गदर्शनाखाली व युवक शहराध्यक्ष इम्रान शेख यांच्या नेतृत्वाखाली “महागाईवर हल्ला चढवू या मोदी सरकारला जाब विचारूया” असे निषेध आंदोलन करण्यात आले. यावेळी भाजप सरकार विरुद्ध संत तुकाराम नगर पेट्रोल पंप ते आचार्य अत्रे नाट्यगृह पर्यंत निषेध आंदोलन करण्यात आला.
यावेळी पिंपरी-चिंचवडचे आजी-माजी नगरसेवक पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात उपस्थित होते, जेष्ठ नेते मोहम्मद पानसरे, महाराष्ट्र प्रदेश युवक सरचिटणीस प्रशांत सपकाळ, पंकज भालेकर, प्रसाद शेट्टी, संजय वाबळे, योगेश गवळी, विशाल वाकडकर, विशाल काळभोर, वीरेंद्र बेहेल, वर्षा जगताप, कार्याध्यक्ष नीलेश निकाळजे, चिंचवड कार्याध्यक्ष प्रसन्न डांगे,प्रशांत काळेल,दिनेश पटेल, विधानसभा अध्यक्ष आयुष निंबाळकर,शारुख शेख, वेदांत माळी, शुभम पंडित, सतेज परब, डॉ.अरुण शिंदे, योगेश मोरे आदि उपस्थित होते.