मुंबई – संतप्त एसटी कर्मचाऱ्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या सिल्व्हर ओक निवासस्थानी आंदोलन केले. यावेळी कर्मचाऱ्यांनी चप्पला फेकल्या तसेच घोषणाबाजी केली. अचानक झालेल्या या आंदोलनामुळे पोलिसांची मोठी तारांबळ उडाली. यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांची पहिली प्रतिक्रिया आली आहे.
आज आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांच्या मुंबई येथील निवासस्थानी घडलेला प्रकार धक्कादायक होता. परंतु दडपशाही वा दबावतंत्र वापरणे असे काहीही न करता सुप्रिया सुळे स्वतः आंदोलकांसमोर गेल्या व त्यांच्यासोबत चर्चा करण्याचा प्रयत्न केला. हे खरे लोकशाहीला शोभणारे नेते आहेत, असं खासदार कोल्हे यांनी म्हटलं.




