बारामती – एसटी कर्मचारी यांनी अचानक मुंबईतील शरद पवार यांच्या सिव्हर ओक या निवासस्थानावर चपला फेकल्या, मोठ्या प्रमाणावर घोषणाबाजी केली. ठिय्या आंदोलन केले त्या पार्श्वभूमीवर शरद पवार यांच्या गोविंद बाग तसेच उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या बारामती येथील सहयोग सोसायटी येथील निवासस्थानी मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला आहे.
आज दुपारी अचानकपणे हा जमाव शरद पवारांच्या घरावर धडकला. त्यावेळी या ठिकाणी केवळ दोन पोलिस कर्मचारी होते. ते या आंदोलकांना आवरू शकले नाहीत. या कर्मचाऱ्यांनी जवळपास पाऊणतास या ठिकाणी गोंधळ घातला. या वेळीच बंगल्यावर चप्पलफेक तसेच दगडही फेकण्यात आले.



