मुंबई : गेल्या अनेक दिवसांपासून भाजप नेते प्रवीण दरेकर यांच्यामागे चौकशीचा ससेमिरा लागला आहे. मुंबै बँक मजूर प्रकरणात मुंबई पोलिसांनी प्रवीण दरेकरांना पुन्हा चौकशीसाठी पोलिसांनी नोटीस बजावली आहे. त्यांना 11 एप्रिलला चौकशीला बोलावणही आलं आहे. काही दिवसांपूर्वीही प्रवीण दरेकरांना पोलिसांनी नोटीस बजावली होती.
दरेकरांना पोलीस नोटीस बजावण्याची आता ही दुसरी वेळ आहे. गेल्या वेळी मी चौकशीला जाणार, कर नाही त्याला डर कशाला? मी पोलिसांना पूर्ण सहकार्य करणार, या प्रकरणात कोणताही घोटाळा झाला नाही, असे दरेकरांनी ठामपणे सांगितले होते. तर दुसरीकडे भाजप नेते किरीट सोमय्या यांनाही कालच पोलिसांनी चौकशीसाठी समन्स बजावला होता. आयएनएस विक्रांत प्रकरणात किरीट सोमय्या यांच्याविरोधात तक्रार दाखल झाली आहे. त्यामुळे भाजपचे दोन नेते आता पोलीस चौकशीच्या फेऱ्यात आहेत.


