
ताथवडे येथून जाणा-या मुंबई – बंगळुरु रस्त्यालगत 60 मीटर रस्त्याच्या दोन्ही बाजूने 12 मीटर सर्व्हिस रस्ता प्रस्तावित करण्याबाबतच्या प्रस्तावाला मान्यता द्यावी. सांगवी ते किवळे बीआरटी मार्गावरील ताथवडे पुनावळे हद्दीपासून पुनावळे रावेत पुलापर्यंत आणि रावेत गावठाणापासून किवळे हद्दीतील मुकाई चौकापर्यंत मंजुर विकास योजनेत असलेली 30 मीटर रस्ता रुंदी 45 मीटर करण्यासाठीच्या फेरबदलास मान्यता देण्याची मागणी शिवसेनेचे माजी गटनेते राहुल कलाटे यांनी राज्य सरकारकडे केली.
याबाबत नगरविकास, सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे यांची राहुल कलाटे यांनी भेट घेतली. त्यांना मागणीचे निवेदन दिले. त्यावर शिंदे यांनी तत्काळ प्रस्ताव सादर करण्याचे आदेश विभागाच्या प्रधान सचिवांना दिले आहेत. शिवसेनेचे संपर्कप्रमुख सचिन अहिर यावेळी उपस्थित होते.



