- अलंकापुरीत माऊली मंदिरात पूजा, श्रींना चंदन उटी
आळंदी, दि. 9 (वार्ताहर) – येथील आवेकर भावे श्री राम संस्थानच्या वतीने आयोजित श्री राम जन्मोत्सवात श्री रामनववी निमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचे प्रथापरंपरांचे पालन करीत आयोजन करण्यात आले आहे.
राम नवमी दिनी प्रभू रामचंद्र नगरप्रदक्षिणेसाठी आपल्या लवाजमासह निघत असतात. पालखीतून श्रींचे पादुकांची प्रदक्षिणा रविवारी (दि. 10) सायंकाळी सहा ते आठ या वेळेत होणार असल्याचे आवेकर भावे श्री राम संस्थानच्या वतीने विश्वस्त नरहरी महाराज चौधरी यांनी सांगितले.
श्री राम जन्मोत्सव दिनी श्री रामरायांची पालखीतून हरिनाम जयघोषात वैभवी पादुका पालखी श्री माऊलींच्या मंदिरात येणार आहे. येथे श्रींचे पादुकांचे पूजन, मंदिर व नगर प्रदक्षिणा होणार आहे. माऊली मंदिरात रामनवमी निमित्त श्रींचे संजीवन समाधीवर चंदन उटी साकारली जाणार आहे.


