पिंपरी : फुगेवाडी आम आदमी पक्षाचे सामाजिक न्याय विभागाचे शहराध्यक्ष यांच्यावर खुनी हल्ला करण्यात आला. ९ एप्रिल ते १० एप्रिल च्या मध्यरात्री साडेबाराच्या दरम्यान मीनाताई ठाकरे मनपा शाळेच्या पुढे फुगेवाडी येथील बोगद्यात दोन तरुणांनी त्यांच्यावर प्राणघातक हल्ला केला आहे.
याबाबत यशवंत श्रीमंत कांबळे यांनी फिर्याद दिली आहे. तर १) आकाश मिसाळ वय २७ वर्ष रा. स्मशान भूमीजवळ पो चौकीचे मागे, जगताप नगर, थेरगाव पुणे १) विधीसंघर्षित बालके वय १५ वर्ष, रा. जगताप नगर, थेरगाव पुणे २) विधीसंघर्षित बालके वय १५ वर्ष रा. साईनाथ कॉलनी, थेरगाव यांच्यावर गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार आम आदमी पक्षाचे सामाजीक न्यायविभागाचे शहर अध्यक्ष एका खाजगी कंपनीत कामानिमित्त आहेत ते काम संपल्यानंतर दुचाकीवरुन घरी सांगवी येथे जात असतांना यातील आरोपी क्र. १ व विधीसंघर्षित बालके यांनी एका दुचाकीवरुन पाठीमागुन येवुन काही एक कारण नसतांना फिर्यादी यांना जिवे ठार मारण्याचे उददेशाने कोयत्यासाख्या हत्याराने त्यांचे डोक्यात पाठीमागुन वार करुन त्यांना जखमी केले. त्यानंतर ते तेथून पळून गेले याबाबत भोसरी पोलीस ठाण्यात २५७ / २०२२ भा.दं.वि. कलम ३०७,३४ आर्म अॅक्ट ४(२५), मपोकाकलम ३७ (१) सह १३५ अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे पुढील तपास पोलिस करत आहेत.




