पुणे – बंगळूरू मुबंई राष्ट्रीय महामार्गावर नऱ्हे नवले पुलाजवळ पुन्हा अपघात झाला आहे. या अपघातात साताराकडून मुबंईकडे जात असणाऱ्या ट्रकच्या धडकेमध्ये तीन वाहनांचा एकमेकांना धडक देऊन झाला आहे.
यामध्ये तीन व्यक्ती जखमी झाल्या असून त्यांना जवळील खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. सुदैवाने अपघातात कुठल्याही प्रकारची जीवितहानी झाली नाही.तसेच प्राथमिक माहितीनुसार ज्या कंटेनरने तीन वाहनांना धडक देऊन पुढे गेल्या नंतर उलटल्याची माहिती मिळाली आहे. दरम्यान, हा ट्रक वारजे पुलाजवळ जाऊन उलटला आहे. आज रविवार असल्याने महामार्गावर मोठ्या प्रमाणात वाहतुक कोंडी झाली आहे. त्यामुळे रस्त्यावर वाहनांच्या रांगा लागल्या आहेत.
कंटेनर हा सातरकडून मुंबईच्या दिशेने भरधाव जात असताना कंटेनरने पुढे जात असलेल्या तीन चारचाकी वाहनांना धडक दिली त्यामध्ये असणाऱ्या तीन वाहने एकामागून एक असे हे अपघात झाले आहे. जखमींना जवळील रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले असल्याचे सिंहगड वाहतूक पोलिसांनी सांगितले. घटनास्थळी अपघाताची माहिती मिळताच सिंहगड पोलीस, सिंहगड वाहतूक विभागाचे पोलीस कर्मचारी यांनी जाऊन रस्त्यावरील वाहने बाजूला करून वाहतूक कोंडी सोडविली आहे.