बोर्लीपंचतन | मकरंद जाधव
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या मुंबई येथील सिल्वर ओक या निवासस्थानावर झालेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे म्हसळा तालुकाध्यक्ष समिर बनकर यांच्या नेतृत्वाखाली शहरामधे मोर्चा काढून या भ्याड हल्ल्याचा तिव्र निषेध करण्यात आला.
८ एप्रिल रोजी संप मिटला असताना सुद्धा मा.न्यायालयाचे आदेश पायदळी तुडवून आमच्यावर अन्याय झाला आहे त्याला फक्त राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार व त्यांचे कुटुंबीय जबाबदार आहे असे गृहीत धरुन कोणाच्या तरी चिथावणीवरुन एसटी कर्मचाऱ्यांकडून अचानकपणे हा भ्याड हल्ला करण्यात आला.एसटी कर्मचाऱ्यांनी केलेला भ्याड हल्ला व निदर्शने हे एक षडयंत्र असून त्यांनी केलेले कृत्य अशोभनीय आहे या कृत्याच्या म्हसळा तालुका राष्ट्रवादी काँग्रेस जाहीर निषेध करीत असून या हल्ल्यामागे व हल्ला घडवून आणण्यात अज्ञात व्यक्तीच्या शक्तींचा हात असून त्यांच्यावर व हल्ला करणाऱ्यांवर तत्काळ कठोरात कठोर कारवाई करावी अशी मागणी म्हसळा तालुका राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने करण्यात आली.
सदर मागणीचे लेखी निवेदन म्हसळा तहसीलदार समिर घारे व म्हसळा पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक उध्दव सूर्वे यांना देण्यात आले. याप्रसंगी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे विविध पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संखेने उपस्थित होते.