गाडी मध्ये का लावली म्हणून झालेल्या वादात गाडी पासिंग करण्यासाठी आलेल्या चालकाला मारहाण केली. (आरटीओ) उपप्रादेशिक परिवहन विभाग कार्यालय, मोशी येथे सोमवारी (दि.11) 11.45 वा ही घटना घडली.
बंडाप्पा सिद्धराम स्वामी (वय 46, रा. कुदळवाडी, मुळगाव औसा, लातूर) यांनी याबाबत एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरून ट्रक चालक (एमएच 14 ईएम 5716) याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे त्याच्या ट्रकचे पासींग करण्यासाठी मोशी येथील आरटीओ कार्यालय येथे गेले होते. त्यावेळी त्यांच्या गाडीच्या पाठीमागे आरोपीचा ट्रक उभा होता. गाडी मध्ये का लावली असे म्हणत आरोपीने फिर्यादी यांना लाकडी दांडकाने मारहाण केली व हात फ्रॅक्चर केला. पोलीस तपास करीत आहेत.



