सांगली : इस्लामपूरमध्ये झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या संवाद मेळाव्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी राज ठाकरेंचा उल्लेख “खाज ठाकरे” असा केला आहे. त्यावरून राजकीय प्रतिक्रिया उमटत असताना मनसेनं त्यांचं नाव न घेता प्रतिटोला लगावला आहे.
इस्लामपूरच्या सभेत बोलताना अमोल मिटकरींनी राज ठाकरेंना प्रत्युत्तर देताना एका दमात हनुमान चालीसा म्हटल्यानंतर तो व्हिडीओ व्हायरल होऊ लागला आहे. याच सभेमध्ये अमोल मिटकरींनी राज ठाकरेंवर निशाणा साधला आहे. “पेट्रोल, गॅसवर, डिझेलवर बोलत नाहीत. नकला करतात…चांगला टाइमपास आहे. साहेबांवर बोलले म्हणून मी खाजसाहेब बोललो. निसर्गाने आम्हालाही दोन हात, पाय, डोकं आणि त्यात मेंदू दिला. पण मेंदू कोणाचा गुलाम ठेवावा याचं भान दिलं असा टोला त्यांनी लगावला.
मनसे “मटण करी” म्हणत टोला…
दरम्यान, अमोल मिटकरींच्या टीकेला प्रत्युत्तर देताना मनसे नेते संदीप देशपांडे यांनी मिटकरींचं नाव न घेता त्यांच्यावर खोचक शब्दांत ट्वीट केलं आहे. संदीप देशपांडेंनी ट्वीटमध्ये राष्ट्रवादीची मटण करी असा उल्लेख केला आहे.

