देहूरोड ,दि.२४ ( वार्ताहर ) विवाहितेचा शारीरिक व मानसिक त्रास देऊन मारहाण व शिवीगाळ केल्याप्रकरणी पतीसह सासरच्या आठ जणांविरुद्ध देहूरोड पोलिस ठाण्यांमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी अद्याप कोणालाही अटक करण्यात आलेले नाही.
अंकुश सोहनलाल गर्ग (पती ) , सासु तुलसा सोहनलाल गर्ग, सासरे सोहनलाल भगतराम गर्ग,ननंद आतिश गोयल सारीका, मोठा दिर कपील गर्ग,जाऊ रिना कपील गर्ग ,चुलत सासरे मोहनलाल गर्ग , चलुत सासु लता गर्ग ( सर्व रा.प्लॉट नं १०२, डी विंग, जुने इंद्रप्रभा सोसायटी.शिंदे पेटोल पंपाजवळ, देहुरोड) यांच्याविरुद्ध विवाहितेने फिर्याद नोंदविली आहे.



