मुंबई : महाराष्ट्र कायद्याचं राज्य आहे. इथे प्रत्येक कारवाई कायद्यानं होते, असं म्हणत संजय राऊत यांनी राणा दाम्पत्यावर झालेल्या कारवाईवर प्रतिक्रिया दिली आहे. तसेच, यावेळी राऊतांनी भाजपवरही निशाणा साधला आहे. जर कोणी लोकप्रतिनिधी एखाद्या पक्षाच्या मदतीनं अशी कारस्थानं करत असेल, तर त्यांच्यावर नक्कीच राजद्रोहाचा खटला दाखल होतो. मुंबईसह महाराष्ट्रात धार्मिक उद्रेक घडवण्याचा प्रयत्न त्यांचा सुरु आहे. मग ते सदावर्ते असतील, राणा दाम्पत्य असतील, यामागे भाजप आहे, असा आरोप संजय राऊत यांनी केला आहे.
राऊत पुढे म्हणाले की, हा न्यायालयाचा निर्णय याच्याशी सरकारचा काहीही संबंध नाही. महाराष्ट्र कायद्याचं राज्य आहे. इथे प्रत्येक कारवाई कायद्यानं होत आहे. काल किंवा अलिकडच्या काळात पोलिसांनी जे चित्र पाहिलं. राणा दाम्पत्याच्या माध्यमातून मुंबईसह महाराष्ट्रात धार्मिक उद्रेक घडवण्याचा प्रयत्न त्यांचा सुरु आहे. मग ते सदावर्ते असतील, राणा दाम्पत्य असतील, यामागे भाजप आहे. हे खूप मोठं षडयंत्र आहे, कारस्थान आहे. त्यांच्यावर पोलिसांनी लावलेली कमल योग्य आहेत असं मला वाटतं. अशा प्रकारे राज्य उठवण्याचा कट धर्माच्या नावावर महाराष्ट्रात नाही, तर कुठेही होऊ नये.
पश्चिम बंगाल असेल, उत्तर प्रदेश असेल किंवा अन्य राज्य असतील, अशाप्रकारे जर कोणी लोकप्रतिनिधी एखाद्या पक्षाच्या मदतीनं अशी कारस्थानं करत असेल, तर त्यांच्यावर नक्कीच राजद्रोहाचा खटला दाखल होतो. हे काही आज होत नाही. भीमा-कोरोगावमध्ये अनेक विचारवंत, लेखक, कवी यांना अटक करुन राज्य उठल्याचा कट त्यांच्यावर मागच्या सरकारनं लावला आहे. त्यामुळे त्यांनी आता आम्हाला शिकवू नये. हे मोठं षडयंत्र आहे असे आरोप संजय राऊत यांनी केले आहे.


