मुंबई दि.२७ : भाजपा नेते किरीट सोमय्या यांना जखम झाली. मात्र, त्यातून रक्तस्त्राव झाला नाही असे वैद्यकीय चाचणीबाबत भाभा रुग्णालयाने दिलेल्या वैद्यकीय अहवालातून समोर आले आहे. तसेच किरीट सोमय्यांना गंभीर इजा झाली नसल्याची माहिती डॉक्टरांनी दिली आहे.
किरीट सोमय्यांनी आपल्याला दुखापत झाल्याचा दावा केल्यानंतर त्यांची वैद्यकीय चाचणी करण्यात आली होती. या वैद्यकीय चाचणीबाबतचा भाभा रुग्णालयाचा वैद्यकीय अहवाल समोर आला आहे. या अहवालामध्ये किरीट सोमय्या यांना किरकोळ जखम झाल्याचे नमूद करण्यात आले आहे. किरीट सोमय्या यांना जखम झाली मात्र त्यातून रक्तस्त्राव झाला नाही असे या वैद्यकीय अहवालामध्ये नमूद करण्यात आले आहे.पोलिसांनी अटकेची कारवाई केलेल्या रवी राणा आणि नवनीत राणा दाम्पत्याला भेटण्यासाठी गेलेल्या किरीट सोमय्या यांच्यावर खार पोलीस ठाण्याबाहेर हल्ला झाला होता.



