पिंपरी : आज शुक्रवार दि.२९ रोजी रहाटणी, पिंपळे सौदागर मधील पाणी समस्या बाबत राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष अजित गव्हाणे व ज्येष्ठ नेते मा. नगरसेवक नाना काटे यांनी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे अतिरीक्त आयुक्त जितेंद्र वाघ यांच्यासह पाणी पुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता सूर्यवंशी, उपअभियंता पाटील, कनिष्ठ अभियंता यांच्या सोबत बैठक संपन्न झाली.
या बैठकीमध्ये प्रामुख्याने कुणाल आयकॉन रोडवरील नविन पाण्याची टाकी तसेच १८ मी. प्लॅनेट मिलेनियम ते स्पॉट १८ मिलिटरी रस्त्यावरील नवीन पाणी पुरवठा लाईन लवकर सुरू करण्याबाबत सूचना करण्यात आल्या. याकरिता अति. आयुक्त जितेंद्र वाघ यांनी येत्या ४ दिवसात नवीन पाण्याची टाकी व नवीन पाईप लाईन द्वारे पाणी पुरवठा सुरळीत केला जाईल असे आश्वासन दिले.
पिंपरी-चिंचवड शहरात अनेक भागात सध्या पाणी टंचाई होत असून ठिकाणी पाणी टंचाई विरोधात राष्ट्रवादी काँग्रेस कडून आंदोलने, मोर्चा होत आहेत. रहाटणी पिंपळे सौदागर परिसरातील प्राणी प्रश्नाबाबत राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष व स्थानिक माजी नगरसेवक नाना काटे यांच्या पुढाकाराने प्रशासनासोबत तात्काळ बैठक घेऊन पाणी प्रश्न बाबत चर्चा घडून आली. याला प्रशासनाकडून सहकार्य मिळत आहे. स्थानिक नागरिकांच्या मनात राष्ट्रवादी काँग्रेसच्या काळात कधी पाणीटंचाईला त्रास सहन करावा लागत नव्हता अशी चर्चा दबक्या आवाजात परिसरात होत आहे.


