वाकड, १२ मे : चिंचवड विधानसभेचे आमदार लक्ष्मण जगताप बाणेर येथील खाजगी रुग्णालयात मागील काही दिवसांपासून एका दुर्धर आजारावर उपचार घेत आहेत. त्याच्या तब्येतीमध्ये आता कमालीची सुधारणा झाली असून आठवड्याच्या आत त्यांना डिस्चार्ज दिला जावू शकतो. नुकतेच आमदार जगताप यांनी हॉस्पिटलच्या बाल्कनीत उभे राहून कार्यकर्त्यांना व समर्थकांना हातवारे करत मी ठणठणीत असल्याबद्दल सांगितले. त्यांची हि प्रसन्न मुद्रा पाहून सर्वांच्याच चेहऱ्यावर आनंद फुलला.
https://m.facebook.com/story.php?story_fbid=731855694926079&id=100043049660205
चिंचवडचे आमदार लक्ष्मण जगताप हे गेली काही दिवसांपासून बाणेर येथील एका खाजगी रुग्णालयात उपचार घेत आहेत. उपचारासाठी दाखल करत असतांना त्यांची तब्येत अतिशय नाजूक अवस्थेत होती. त्यामुळे सर्वत्र उलटसुलट चर्चा सुरु होत्या. भाऊंची तब्येत लवकर बरी व्हावी यासाठी संपूर्ण पिंपरी चिंचवड शहरात त्याच्या चाहत्यांनी व राजकीय नेत्यांनी देव देवताना नवस आणि महाआरत्या केल्या. शेवट डॉक्टरांची दवा आणि लोकांची दुवा यामुळे भाऊची तब्बेत पूर्ववत होत आहे.
सध्या आमदार जगताप यांची तब्येतीत मोठी सुधारणा झाली आहे. त्यांनी स्वत: हॉस्पिटलच्या बाल्कनीत येवून सर्वाना अभिवादन केले. हास्य मुद्रा करत मी ठीक आहे असे हाताने सांगतानाचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. आता भाऊ लवकरच घरी येतील आणि थोड्याच दिवसात लोकामध्ये पुन्हा रमतील अशी अपेक्षा कार्यकर्त्यांनी व हितचिंतकांनी व्यक्त केली.




