पिंपळे सौदागर मधील मनपा तर्फे बांधण्यात आलेल्या आत्याधूनिक विविध खेळ उदा. क्रिकेट, फुटबॉल, रांनिंग, स्केटिंग, बास्केट बॉल इत्यादी खेळ प्रकार असलेल्या कै. बाळासाहेब कुंजीर क्रीडांगणचे उद्घाटन महाराष्ट्र राज्याचे उपुख्यमंत्री तथा पालकमंत्री मा. ना. अजितदादा पवार साहेब यांचे हस्ते करण्यात आले.

या क्रीडांगणासाठी माजी नगरसेवक विठ्ठल उर्फ नाना काटे व सौ. शितलताई नाना काटे यांनी पिंपळे सौदागर मध्ये असे अत्याधुनिक क्रीडांगण व्हावे याठी प्रयत्न केले होते. ते आज पूर्ण होवून नागरिकांसाठी खुले कण्यात आले.

याप्रसंगी पिंपरी चिंचवड मनपा आयुक्त राजेश पाटील, अति. आत्युक्त विकास ढाकणे, अति. आयुक्त. जितेंद्र वाघ, मा. महापौर संजोग वाघेरे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष अजित गव्हाणेे, माजी नगरसेवक शत्रुघ्न काटे, मा. उपमहापौर प्रभाकर वाघेरे, माजी नगरसेवक मयूर कलाटे, माजी नगरसेवक डब्बू आसवानी, मा. नगरसेविका निर्मलाताई कुटे, संदिप काटे, अनिताताई काटे, कैलास कुंजीर, मा. नगरसेवक शंकरभाऊ काटे व परिसरातील सोसायटी मधील नागरिक ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.




