मुंबई : विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची महाविकास आघाडीच्या नेत्यांची भेट घेतली. विधानपरिषदेसाठी पाचवी जागा देण्याचा प्रस्ताव भाजपला या भेटीदरम्यान देण्यात आला आल्याचं सूत्रांनी म्हटलंय. त्या बदल्यात भाजपने आपल्या राज्यसभेचा उमेदवार मागे घ्यावा, असा प्रस्ताव देण्यात आला.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, भाजप मात्र राज्यसभेच्या तिसऱ्या उमेदवाराबाबत ठाम असल्याची माहिती मिळतेय. सध्या राज्यसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींना वेग आलाय. राज्यसभेच्या सहाव्या जागेची निवडणूक बिनविरोध करण्याचा महाविकास आघाडी सरकारचा प्रयत्न आहे. यासाठी महाविकास आघाडीचं शिष्टमंडळ, सागर बंगल्यावर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांच्या भेटीला गेलं होतं. महाविकास आघाडीच्या या शिष्टमंडळात छगन भुजबळांच्या नेतृत्वात, अनिल देसाई, सुनील केदार, सतेज पाटील या नेत्यांचा समावेश होता.



