पिंपरी : महापालिका निवडणुकीपूर्वी पिंपरी-चिंचवड भाजपला आणखी एक धक्का बसला असून, भाजपचे सरचिटणीस बाबू नायर यांनी गुरुवारी संध्याकाळी पक्षाचा त्याग करून काँग्रेसमध्ये प्रवेश केला.
काँग्रेस पक्षाच्या चिंतन शिबिरात प्रदेश काँग्रेस अध्यक्ष नाना पटोले, माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण आणि बाळासाहेब थोरात यांच्यासारख्या ज्येष्ठ नेत्यांच्या उपस्थितीत नायर यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश झाला.
यावर नायर यांनी सांगितले की, “मी भाजपचा राजीनामा दिला आहे आणि काँग्रेसमध्ये सामील झालो आहे. भाजपने 2014 मध्ये दिलेल्या विकासाच्या राजकारणापासून दूर गेल्याने त्यांनी भाजपला जय श्रीराम केला असल्याचे सांगितले.




