पिंपरी : पिंपरी चिंचवड महापालिकेचे “ब क्षेत्रिय कार्यालय अंतर्गत बी.आर.टी. रोड रावेत येथील अनधिकृत व्यवसायिक पत्राशेडवर दि. ०७/०६/२०२२ रोजी महापालिकेचे बांधकाम परवानगी व अनधिकृत बांधकाम नियंत्रण विभाग व ‘ब’ क्षेत्रिय कार्यालय यांनी संयुक्तिक अनधिकृत बांधकामावर कारवाई केली. सदर कारवाई मध्ये ४४ पत्राशेड ४ विट बांधकाम व पत्रा असे एकुण अंदाजे १२२६३.०० चौ.मी. (१,३१,९५०.०० चौ. फुट) अनाधिकृत बांधकामे निष्कासित केली.

सदर कारवाई जितेंद्र वाघ अतिरिक्त आयुक्त (२) मकरंद निकम, मा. शहर अभियंता, यांचे मार्गदर्शनाखाली संजय घुबे कार्यकारी अभियंता बांधकाम परवानगी व अनधिकृत बांधकाम नियंत्रण विभाग, यांचे नियंत्रणाखाली करणेत आली. सदर कारवाई अभिजित हराळे, क्षेत्रीय अधिकारी व प्रभाग व दिपक करपे उप अभियंता राजेंद्र डुंबरे उपअभियंता प्रविण धुमाळ, रमेश जिंतीकर कनिष्ठ अभियंता, अ व ब प्रभाग येथील धडक कारवाई पथकातील स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक ८ व मनपा कर्मचारी व अतिक्रमण विभाग कर्मचारी तसेच ०६ मनपा पोलिस कर्मचारी व रावेत पोलिस स्टेशन ०५ पोलीस उपनिरीक्षक, २१ पोलिस कॉन्स्टेबल कर्मचारी, महाराष्ट्र पोलिस सुरक्षाबल ५४ कर्मचारी यांच्या सहाय्याने करणेत आली. सदर कारवाई ७ जेसीबी तसेच १४ मजुर यांच्या मार्फत कारवाई करणेत आली.



