पिंपरी चिंचवड महानगरपालिका बांधकाम परवानगी व अनाधिकृत बांधकाम नियंत्रण विभाग ‘ड’ क्षेत्रिय कार्यालयांतर्गत वाकड परिसरातील प्रभाग क्र. २६ वाकड स्मशान भूमी ते सुखवानी पेट्रोल पंप येथे व मुंबई बेगलोर हायवे वाकड व ताथवडे येथे आज दि. ०७/०६/२०२२ रोजी अनधिकृत बांधकामावर कारवाई करणेत आली. सदर कारवाई मध्ये बाकड़ स्मशान भूमी ते सुखवानी पेट्रोल पंप येथे ५२ पत्राशेड व मुंबई बेगलोर हायवे वाकड व ताथवडे येथे ५४ पत्राशेड निष्कासित करणेत आले. सदर बांधकामाचे अंदाचे क्षेत्रफळ १,८८,००० चौ.फु. आहे.
सदर कारवाई जितेंद्र वाघ, मा. अतिरिक्त आयुक्त (२), मकरंद निकम, मा. शहर अभियंता यांचे मार्गदर्शनाखाली सुनिल भागवानी कार्यकारी अभियंता बांधकाम परवानगी अनाधिकृत बांधकाम नियंत्रण विभाग, यांचे नियंत्रणाखाली करणेत आली. सदर कारवाई उमाकांत गायकवाड, क्षेत्रिय अधिकारी 3 प्रभाग व संजय तुपसाखरे उपअभियंता विजय भोजने उपअभियंता, नितीन निंबाळकर उपअभियंता, श्रीम. मनाली स्वामी, श्रीम. वंदना मोरे, सुशिलकुमार लवटे कनिष्ठ अभियंता १० स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक (बीट निरीक्षक ) तसेच मनपा पोलीस ०८, वाकड पोलीस स्टेशन कडील सहायक पोलीस निरीक्षक- १. इतर पोलीस कर्मचारी ०५, तसेच महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळाचे ६० सुरक्षा रक्षक, अग्निशामक विभागाचे अग्निशामक दल आरोग्य विभागाची रुग्णवाहिका, विद्युत विभागाचे कर्मचारी उपस्थित होते. सदर कारवाईस १ पोकलेन, १० जेसीबी, ४० मजूर, ६ ब्रेकर इत्यादी मार्फत करणेत आली.




