मुंबई : विधान परिषद निवडणुकीची सध्या राज्यभरात धामधूम सुरू आहे. विविध पक्षाचे नेते त्यामुळे आपल्या पक्षश्रेष्ठींकडे उमेदवारीच्या इच्छेने धाव घेत आहेत. त्यातून आता कोणाचा पत्ता कट होणार आणि कोणाची विधान परिषदेवर वर्णी लागणार याकडे राज्याचं लक्ष लागून आहे. दरम्यान, राष्ट्रवादीकडून उमेदवारीसाठी रामराजे नाईक निंबाळकर आणि एकनाथ खडसे यांनी आज शरद पवारांची भेट घेतली.
विधान परिषदेसाठी राष्ट्रवादीकडून या दोघांना उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे. रामराजे निंबाळकर सध्या विधान परिषदेचे सभापती आहेत. तर एकनाथ खडसे यांचे नाव राज्यपाल नियुक्त बारा जागांसाठी पाठवले आहे. पण अजूनही राज्यपालांनी त्यांना मान्यता दिली नसल्याने आता विधान परिषदेवर त्यांची वर्णी लागण्याची शक्यता आहे.



