पुणे : गडकरी त्यांच्या कामाप्रती सतत चर्चेत असतात. त्यांची भाषणे सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत असतात. रस्त्यांबद्दल त्यांची आश्वासने असो किंवा रस्ते बनविवलेले रेकॉर्ड असोत ते सतत चर्चेचा विषय असतात.अशातच पुणे येथे वसंतदादा शुगर इन्सिट्युटच्या वतीने राज्यस्तरीय साखर परिषद २०२२ कार्यक्रमाचं उद्घाटन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत केलेल्या भाषणात नितीन गडकरी असे काही बोललेत की ते आता सोशल मीडियावर ट्रोल होत आहे.
या कार्यक्रमात बोलताना नितिन गडकरी म्हणाले की आता पुणे ते बेंगलोर फक्त साडेतीन तासात प्रवास करता येणार असा महामार्ग काढणार आहे. मग काय, त्यांच्या या विधानाला नेटकऱ्यांनी चांगलेच घेरले आणि यावर थेट मिम्स बनविण्यास सुरवात केली.सध्या हे मिम्स सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत असून नितीन गडकरी यामुळे ट्रोल होत आहे. नेटकरी त्यांच्या यावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहे.
यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार, आरोग्य मंत्री राजेश टोपे, गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्यासह बाळासाहेब पाटील दिग्गजांची उपस्थिती होती.



