पवनानगर : पवन मावळातील शिवणे विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीच्या संचालकपदी पुणे जिल्ह्यात पहिल्यांदाच एकाच घरातील आई-वडील व मुलगा असे तिघेही विजयी झाले असून मावळ तालुक्यातील मोठी सोसायटी म्हणून शिवणे विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीची ओळख असून ही निवडणूक दि.५ जून ( रवि) रोजी झाली असून या सोसायटी निवडणुकीसाठी शिवणे, मळवंडी ढोरे,सडवली ,ओझर्डे ,आढे येथील सभासद शेतकरयांनी मतदार केले असून याप्रसंगी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून आर. के. निखारे यांनी कामकाज पाहिले.
शिवणे विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीवर ९ संचालक निवडून आणत ग्रामविकास शेतकरी सहकार पॅनलच्या माध्यमातून निर्विवाद वर्चस्व प्रस्थापित केले असून भारतीय जनता पार्टीने ही सहकारी निवडणूक अतीशय वर्चस्वाची बनवली होती कारण ही निवडणूक एका अर्थाने भाजप विरुद्ध राष्ट्रवादी अशी सरळ लढत होती या निवडणुकीसाठी स्वतः मावळचे माजी सभापती ,पुणे कृषी उत्पन्न बाजार समिती माजी सभापती एकनाथ टिळे हे निवडणूक लढत असल्यामुळे सत्ता प्रस्थापित करणे प्रतिष्ठेचे होते तसेच भाजपाची मावळात होत असलेली गळती थांबविण्यासाठी व कार्यकर्त्यांमध्ये उत्साह निर्माण करण्यासाठी व आगामी जिल्हा परिषद,पंचायत समितीच्या होऊ घातलेल्या निवडणूकाच्या संदर्भात भाजप साठी हा विजय किमान पवन मावळात महत्वाचा मानला जात आहे. भाजप पुरस्कृत ग्रामविकास शेतकरी सहकार पॅनेलचे एकूण ९ उमेदवारांची संचालकपदी निवड झालू असून यामध्ये एकनाथ टिळे, धनंजय टिळे, गुलाब घारे, तानाजी कारके ,शंकर देशमुख, बाळासाहेब रसाळ, बाळासाहेब गायकवाड, तर महिला प्रतिनिधी माधुरी पडवळ, सावित्रीबाई टिळे यांची संचालकपदी निवड झाली आहे.
राष्ट्रवादी पुरस्कृत श्री भैरवनाथ परिवर्तन शेतकरी विकास पॅनलचे एकूण ४ उमेदवारांची संचालकपदी निवड झाली असून यामध्ये मारूती चौधरी,तबाजी म्हस्के, निवृत्ती सुतार व बिनविरोध निवड झालेले मारूती म्हसुडगे या सर्वांची शिवणे विविध कार्यकारी सेवा सोसायटीच्या संचालकपदी निवड झाली आहे. सोसायटीच्या एकूण १३ जागांसाठी निवडणूक झाली असून यातील १ जागा ही अगोदर बिनविरोध निवड झाली होती या निवडणूकी नंतर भाजप पुरस्कृत पॅनेलने गेल्या ४० वर्षांपासून शिवणे सोसायटीत वर्चस्व प्रस्थापित केले असून विजयानंतर गावांमध्ये भंडाऱ्याची उधळण करत आनंदोत्सव साजरा करण्यात आला.




