औरंगाबाद : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची आज औरंगाबादमध्ये सभा होणार आहे. सभेसाठी शिवसेनेने पूर्ण तयारी केली आहे. आगामी महानगरपालिका निवडणुकीच्या दृष्टीने शिवसेनेकडून शक्तीप्रदर्शन केलं जाणार आहे. या सभेमध्ये उद्धव ठाकरे काय बोलणार याची उत्सुकता असताना दुसरीकडे भाजपा नेते मात्र यावरुन टोलेबाजी करत आहेत. यादरम्यान औरंगाबादमधील शिवसेना नगरसेवकाने केलेली जाहिरातबाजी सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. आमचं हिंदुत्व शेंडी जानव्याचं नाही असं सांगत नगरसेवकाने भाजपावर जोरदार टीका केली आहे.
जाहिरातीत काय म्हटलं आहे?
शिवसेनेचे माजी नगरसेवक चेतन कांबळे यांनी ही जाहिरात दिली असून औरंगाबादमध्ये चांगलीच चर्चा रंगली आहे. “ईडी, आर्थिक कोंडी आणि बदनामी करुन उद्धव ठाकरे सरकारला घेरलं तर गाठ शिवशक्ती-भीमशक्तिशी आहे,” असा इशारा चेतन कांबळे यांनी जाहिरातीतून गिली आहे.



