बेंगलोर : बंगळुरुत भाजपा आमदाराच्या मुलीने वाहतुकीचे नियम तोडल्यानंतर पोलीस कर्मचाऱ्यांसोबत अरेरावी केल्याचा व्हिडीओ सध्या व्हायरल झाला आहे. बीएमडब्ल्यूमधून प्रवास करत असलेल्या मुलीने सिग्नल तोडल्यानंतर पोलिसांनी थांबवलं असता त्यांच्यासोबत वाद घातला. यावेळी तिने स्थानिक पत्रकार आणि कॅमेरामनसोबतही हुज्जत घातल्याची माहिती आहे.
भाजपा आमदार अरविंद निंबावली यांची मुलगी बीएमडब्ल्यू चालवत होती. नियमाचं उल्लंघन केल्याने वाहतूक पोलीस कर्मचाऱ्यांनी तिला रोखलं. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार तिने सीटबेल्टही लावलेला नव्हता.