मुंबई : राज्यात राज्यसभा निवडणुकीच्या चर्चा व निकालाची उत्कंठा पहाटे तीन वाजेपर्यंत सुरू होती त्यानंतर सहाव्या जागेसाठी लढत झालेले कोल्हापूरचे धनंजय महाडिक व शहाजी पवार यामध्ये धनंजय महाडिक यांनी बाजी मारली दुसऱ्या क्रमांकाच्या मतांच्या जोरावर धनंजय माळी यांनी विजय खेचून आणला.
त्यावर प्रतिक्रिया देताना खासदार संजय राऊत यांनी पहिल्या पसंतीची मते शिवसेना च्या उमेदवारालाच मिळाली आहेत केवळ दुसऱ्या क्रमांकाच्या मताच्या जरा वर धनंजय महाडिक विजयी झाले आहेत तसा नैतिक विजय शिवसेनेच्याच उमेदवाराचा झाला आहे अशी प्रतिक्रिया दिली त्याच बरोबर महा विकास आघाडी सोबत असणाऱ्या आमदारांनी आतून दुसरे काम केले त्यांची नावे मीडियासमोर आली.
यामध्ये आमदार देवेंद्र भुयार (मोर्शी), आमदार हितेंद्र ठाकूर (वसई), आमदार श्यामसुंदर शिंदे, लोहा (नांदेड), आमदार संजय मामा शिंदे (करमाळा), आमदार राजेश पाटील (बोईसर), आमदार क्षीतिज ठाकूर (नालासोपारा) अशी आहेत. या सर्व आमदारांनी महाविकास आघाडीला मतदान करताना दगाफटका केला आहे अशी प्रतिक्रिया राऊत यांनी दिली आहे.



