तळेगांव स्टेशन (प्रतिनिधी-संदीप गाडेकर ) पुणे विभागाचे टीडीएफचे माजी शिक्षक आमदार शिवाजीदादा पाटील यांच्या स्मृतिदिनानिमित्त दरवर्षी जिल्हास्तरीय गुणवंत शिक्षकांना सन्मानित केले जाते. यावर्षीचा स्व. शिवाजी दादा पाटील स्मृती जिल्हास्तरीय गुणवंत शिक्षक पुरस्कार, श्रीराम विद्यालय, नवलाख उंबरे येथील आदर्श व विद्यार्थी प्रिय शिक्षक अशोक धनोकार यांना प्रदान करण्यात आला.
हा पुरस्कार तळेगाव ढमढेरे तालुका शिरूर येथे नाशिक विभागाचे माजी आमदार नानासाहेब बोरस्ते, महाराष्ट्र राज्य संयुक्त महामंडळाचे संस्थापक अध्यक्ष रावसाहेब आवारी, टीडीएफचे कार्याध्यक्ष जी.के. थोरात, विश्वस्त के.एस. ढोमसे, पुणे जिल्हा दूध संघ अध्यक्षा केशरताई पवार, उपसभापती सविता पराड , पुणे शहर अध्यक्ष प्राचार्य शिवाजीराव कामथे , माध्यमिक शिक्षक संघाचे जिल्हाध्यक्ष वसंतराव ताकवले, सचिव पंकज घोलप या सर्व मान्यवरांच्या हस्ते पुरस्कार देण्यात आला. यावेळी सौ.स्नेहल बाळसराफ, सौ.दुर्गा धनोकार, राधाकृष्ण येणारे उपस्थित होते.