अमरावत : शरद पवार यांनी बोलावलेल्या पक्षाचे मंत्री व नेत्यांच्या बैठकीत राज्यसभा निवडणुकीचा आढावा घेण्यात आला. दरम्यान या बैठकीत शिवसेनेचे प्रवक्ते आणि खासदार संजय राऊतांविरोधात नाराजी जाहीर करण्यात आल्याचंही समजत आहे. यावर बैठकीत सहभागी असलेल्या सुप्रिया सुळेंनी भाष्य केलं आहे. त्या अमरावतीत प्रसारमाध्यमांशी बोलत होत्या
संजय राऊत यांच्याबद्दल रोष
राज्यसभा निवडणुकीतील पराभवाबद्दल आघाडीला समर्थन देणाऱ्या अपक्ष आमदारांवर जाहीरपणे संशय व्यक्त करणारे शिवसेना खासदार संजय राऊत यांच्याबद्दल काही मंत्र्यांनी बैठकीत नाराजी व्यक्त केल्याची माहिती आहे. पुढे विधान परिषद निवडणूक आहे, अशा वेळी अपक्षांना नाराज केले तर त्याचे प्रतिकूल परिणाम होऊ शकतात, अशी भीतीही काही नेत्यांनी व्यक्त केल्याचे समजते