पिंपरी : देहूतल्या शिळा मंदिर लोकार्पण सोहळा कार्यक्रमामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी भाषण केले. मात्र, उपमुख्यमंत्री अजित पवार यांना बोलण्याची संधी मिळाली नाही. यावरुन पिंपरी चिंचवड राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे कार्याध्यक्ष प्रशांत शितोळे यांनी केंद्र सरकारवर टीका केली.
'औपचारिक सभा की प्रचारसभा'
देहू येथील मा. पंतप्रधानांच्या कार्यक्रमात विरोधी पक्षनेत्यांना बोलण्याची संधी दिली पण राज्याचे उपमुख्यमंत्री मा. अजितदादा पवार यांना बोलू न देता पांडुरंगाच्या दरबारी देखील भारतीय जनता पार्टीने आपला अजेंडा रेटून दाखवलाय.@NCPspeaks https://t.co/FmbvlVZFnL
— Prashant Shitole (@shitoleprashant) June 14, 2022
शितोळे म्हणाले की, दादा हे राज्याचे उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्हाचे पालकमंत्री देखील आहेत. मात्र जाणीपूर्वक देहूतल्या संत तुकाराम मंदिराच्या शिळेच्या लोकार्पण सोहळ्यात त्यांना बोलू न देणं हा महाराष्ट्राचा अपमान आहे. या कार्यक्रमामध्ये विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी भाषण केलं. पण पालकमंत्री अजित पवार यांना बोलण्याची संधी का मिळाली नाही. महाराष्ट्राच्या मराठी संस्कृतीत मराठा माणसाचा अपमान अन तोही वारकरी संप्रदायाच्या उपस्थित होणे योग्य नाही. अशी टीका प्रशांत शितोळे यांनी केली आहे.
पंतप्रधान यांच्या हस्ते देहूतील शिळा मंदिराच्या लोकार्पण सोहळ्यात महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे राजशिष्टाचार याप्रमाणे पंतप्रधानांचे स्वागत करण्यासाठी व देहू संस्थांच्या निमंत्रण मिळाल्यानंतर या ठिकाण आणि कर्तव्य व जबाबदारी म्हणून हजर होते. या कार्यक्रमात अजितदादांना भाषण करण्यापासून कार्यक्रम पत्रिका ज्यांनी बनवली त्यांचा शोध घेऊन त्यांना हे कोणी करायला प्रवृत्त केले याचा तपास झालाच पाहिजे त्याच वेळी या महाराष्ट्राला अभिमान राहणार आणि संत तुकाराम महाराजांच्या धार्मिक कार्यक्रमात खरा नासका आंबा कोण आहे हे जनतेला माहित होईल.
अजितदादा पालकमंत्री असलेल्या पुणे जिल्ह्याचा सुद्धा हा अपमान आहे. पण केवळ संत वारकरी संप्रदाय यांना अभिप्रेत असणारा संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम यांच्या नगरीतील सोहळा अभिमानस्पद मानणे हेच कर्तव्य असल्याने देशाचा नेतृत्वाचा सन्मान करणे, स्वागत करणे व त्यांचे आभार मानणे यात कोणतीही कसूर असू नये अशी अजितदादांची भावना त्यांनी यापूर्वी देखील संबंधित प्रशासनाला सूचना केलेली संपूर्ण पुणे जिल्ह्यासह राज्यातील जनतेने पाहिले.
पिंपरी-चिंचवड शहरातील अनेक नेते मंडळी तुकोबारायांच्या नगरीत झळकली पण खरोखरीच आपल्या महाराष्ट्राची परंपरा सर्वांनी जागृत ठेवली पाहिजे आपण आपल्याच व्यक्तीचा आदर करणार आहोत व अनादर पण आपणच करणार आहोत हेच जर लक्षात येत नसेल तर मराठी माणूस म्हणून आपण स्वतःचा अपमान सुद्धा करत आहोत याचे भान अजित दादांचे भाषण होऊ न देणाऱ्या व्यक्तींनी ठेवायला पाहिजे अशी टीका प्रशांत शितोळे यांनी केली.




