तळेगांव स्टेशन (प्रतिनिधी) ॲड. पु.वा .परांजपे विद्या मंदिर मध्ये नवीन शैक्षणिक वर्षामध्ये सर्व विद्यार्थ्यांचे आनंदी व उत्साही वातावरणात स्वागत करण्यात आले. विद्यार्थ्यांच्या स्वागतासाठी नूतन महाराष्ट्र विद्या प्रसारक मंडळाचे सहसचिव शालेय समिती अध्यक्ष नंदकुमार शेलार, शालेय समिती सदस्य, माजी विद्यार्थी आनंद भेगडे शालेय समिती सदस्य, माजी विद्यार्थी अशोकराव काळोखे. मुख्याध्यापक पोटे, पर्यवेक्षक कापरे सर्व शिक्षक वृंद, शिक्षकेतर कर्मचारी, पालक वर्ग उपस्थित होते. शाळेच्या गेट जवळ नवीन विद्यार्थ्यांचे औक्षण करण्यात आले. टाळ्यांच्या गजरात विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यात आले.
विद्यार्थ्यांना भेटवस्तू म्हणून शरद जांभळे यांच्या वतीने पेन देण्यात आले. त्यानंतर परिपाठ घेण्यात आला. विद्येची देवता सरस्वती पूजन करून कार्यक्रमास सुरुवात करण्यात आली. शाळेतील विद्यार्थिनींनी स्वागत गीत म्हणून सर्वांचे स्वागत केले शासनाकडून आलेल्या पुस्तकांचे इयत्ता पाचवी ते आठवीच्या विद्यार्थ्यांना प्रातिनिधिक स्वरूपात मान्यवरांच्या हस्ते वाटप करण्यात आले. याप्रसंगी शालेय समिती अध्यक्ष नंदकुमार शेलार साहेब यांनी विद्यार्थ्यांचे स्वागत केले. भावी शैक्षणिक वाटचालीसाठी त्यांना शुभेच्छा दिल्या आणि अमृतमहोत्सवी वर्ष आनंदात उत्साही वातावरणात साजरा करण्याचा मानस सांगितला.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापक पांडुरंग पोटे यांनी केले. आभार शिक्षक प्रतिनिधी दुर्गा भेगडे यांनी तर सूत्रसंचालन वैशाली कोयते यांनी केले.



