पिंपरी : देहू येथील पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या कार्यक्रमात विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना बोलण्याची संधी दिली. परंतु राज्याचे उपमुख्यमंत्री तथा पुण्याचे भूमिपुत्र पालकमंत्री अजितदादा पवार यांना बोलू दिले नाही. याविरोधात देहुगाव येथील कमानी समोर राष्ट्रवादी महिला काँग्रेस पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी टाळ कुटो आंदोलन केले.
विभागीय अध्यक्षा वैशालीताई नागवडे यांच्या नेतत्वाखाली देहू गावात भाजप सरकारचा निषेध करण्यात आला. यावेळी राष्ट्रवादी पुणे जिल्हा ग्रामीण अध्यक्षा भारतीताई शेवाळे, पिंपरी चिंचवड महिला शहर अध्यक्षा कविताताई आल्हाट , पिंपरी चिंचवड शहर महिला पदाधिकारी, पुणे शहर पदाधिकारी, पुणे ग्रामीण पदाधिकारी उपस्थित होते.
राष्ट्रवादी काँग्रेस महिला आघाडीच्या वतीने तीर्थक्षेत्र देहू येथील मुख्य प्रवेशद्वाराखाली टाळ वाजून केंद्र सरकार व भाजपचा जोरदार निषेधार्थ घोषणा देत निषेध करण्यात आला. निषेध रॅली काढण्यात आली. रॅली मुख्यमंदीरा जवळ आल्यानंतर आंदोलकांनी मुख्य मंदिरात दर्शन घेऊन रॅलीचा भाजपच्या कुटील कारस्थान करणाऱ्या नेत्यांना सद्बुद्धी देण्याची प्रार्थना करण्यात आली.
राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष भारती शेवाळे, पुणे अध्यक्ष वैशाली नागवडे, तालुकाध्यक्ष दीपाली गराडे, राजश्री डाखोरे, बॉबी डिका, देहू शहराध्यक्ष रेश्मा मोरे, नगराध्यक्ष स्मिता चव्हाण उपनगराध्यक्षा रसिका काळोखे, नगरसेविका पौर्णिमा परदेशी, ज्योती टिळेकर, वैशाली टिळेकर, शितल हगवणे यासह तालुका सरचिटणीस बाळासाहेब जाधव, बाळासाहेब काळोखे, दिनेश बालघरे, नगरसेवक योगेश परंडवाल, योगेश काळोखे आनंदा काळोखे, प्रवीण काळोखे, रोहित काळोखे, अभिजीत काळोखे, शहराध्यक्ष विकास कंद, प्रकाश हगवणे सचिन काळोखे गोकुळ किरवे सोमनाथ चव्हाण विशाल परदेशी सुनील कडूसकर संदीप शिंदे शिवाजी टिळेकर राजू दौंडकर, सचिन कुंभार, सुभाष माने, रुपेश सोनुणे, प्रणव काळोखे यासह मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते.
तीर्थक्षेत्र देहू येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते संत तुकाराम महाराज शिळा मंदिराचे लोकार्पण सोहळा संपन्न झाल्यानंतर आयोजित संवाद सभेमध्ये राज्याची उपमुख्यमंत्री व जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांना राज्य शिष्टाचार न राखता बोलण्याची संधी दिली नाही. तसेच स्थानिक खासदार आमदार व देहूचे नगराध्यक्ष यांना स्वागताची संधी न देता त्यांना मंचावर बसण्याची संधी दिली नाही. तसेच निमंत्रीत पास देण्यात आलेले नाही. हा भाजपने कुटिल कारस्थान केले आहे.भाजपाच्या नेत्यांनी जाणून-बुजून हा अपमान केला आहे. हि सर्व बाब अशोभनीय आहे .वास्तविक हा कोणत्याही पक्षाचा कार्यक्रम नसून धार्मिक कार्यक्रम होता.
मात्र भाजप अध्यात्मिक आघाडीचे अध्यक्ष तुषार भोसले यांनी कुटिल प्रणित राजकारण करीत वारकरी संप्रदायाच्या धार्मिक कार्यक्रमाचे राजकीय व्यासपीठ तयार केले आणि राजशिष्टाचार न राखता महाराष्ट्राचा अपमान केला आहे. या संपूर्ण कार्यक्रमाची योग्य ती चौकशी करून संबंधित कुटिल कारस्थान करणाऱ्यांवर कारवाई करावी. अशी मागणी निवेदनाद्वारे जिल्हाधिकारी तथा जिल्हा दंडाधिकारी पुणे यांच्याकडे केली असून त्याची प्रत देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी राज्याचे मुख्यमंत्री यांना पाठविले आहे.




