चांदखेड: येथील पुणे जिल्हा शिक्षण मंडळ, पुणे या संस्थेच्या न्यू इंग्लिश स्कूल, चांदखेड या विद्यालयात इयत्ता ५वी ते इयत्ता १०वीमध्ये नवीन शैक्षणिक वर्ष २०२२-२३ मध्ये प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांचे शाळेच्या पहिल्याच दिवशी औक्षण करून व त्यांच्यावर पुष्पवृष्टी करून स्वागत करण्यात आले.या नवागतांना विद्यालयाच्या वतीने चॉकलेट व पेन देऊन त्यांचे आनंदाने व टाळ्यांच्या गजरामध्ये विद्यालयाच्या प्रांगणात स्वागत करण्यात आले. याप्रसंगी चांदखेड गावातील प्रतिष्ठित ग्रामस्थ तसेच पालक व मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.याप्रसंगी पोलीस पाटील दत्तात्रय माळी, जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसव्यापारी सेलचे अध्यक्ष संजय गायकवाड, माजी सरपंच व शाळा व्यवस्थापन समिती सदस्य संतोष बांदल, मा.उपसरपंच पौरस बारमुख, मा.ग्रा.पं. स.शामराव गायकवाड, संत रामजीबाबा पतसंस्था संचालक विठ्ठल गायकवाड, तंटामुक्ती अध्यक्ष वसंतराव गायकवाड, शाळा व्यवस्थापन समिती सदस्य प्रदीप म्हसूडगे, सामाजिक कार्यकर्ते संतोष आगळे, दत्तात्रय आगळे, विनोद गायकवाड, प्रतिष्ठित ग्रामस्थ, पालक व इतर मान्यवर उपस्थित होते.
विद्यालयातील इयत्ता ५ वी ते ८वीच्या सर्व विद्यार्थ्यांना शासनाच्या समग्र शिक्षा अभियान उपक्रमांतर्गत मोफत पाठ्यपुस्तके वितरीत करण्यात आली.
याप्रसंगी विद्यालयाचे प्रभारी मुख्याध्यापक एस.ए.पवार यांनी प्रास्ताविक केले.पो.पा. दत्तात्रय माळी यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. उपशिक्षक झांजरे एच.बी.यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी जेष्ठ शिक्षिका पवार एस.आर, सांस्कृतिक विभाग प्रमुख भोये एस.पी., जाधव व्ही.एस.खांडवी पी.आर,मधवे एस.एल, फापाळे एम.आर, विरणक टी.व्ही.पवार व्ही. बी, साबळे बी.एस,शेलार वाय.एल, तसेच आवारी एन.डी, गोपने ए.ए, गायकवाड व्ही.के.व मदने एस.जी यांनी प्रयत्न केले.




